
मुंबई ; बीसीसीआय निवड समितीने आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने वर्ल्ड कपसाठी मुख्य संघात 15 खेळाडूंचा समावेश केला आहे.
रोहित शर्मा वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडिया श्रीलंकेत आशिया कप 2023 स्पर्धा खेळत आहे. श्रीलंकेत बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कॅप्टन रोहित शर्मा यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर आगरकर आणि रोहित या दोघांची पत्रकार परिषद पार पडली. आगरकर यांनी या पत्रकार परिषदेत वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली.