सांगलीत शेतकऱ्याने केली गांजाची लागवड : वीस किलो गांजा जप्त

सांगली : जत  तालुक्यातील एका शेतकऱ्याने गांजाची लागवड केल्याचं उजेडात आलं आहे. ज्यावेळी पोलिसांनी सगळा परिसर तपासून पाहिला त्यावेळी त्यांना तब्बल 20 किलो गांजा शेतात सापडला आहे.सापडलेल्या गांजाची किंमत अंदाजे किंमत साडे पाच लाख रुपये असल्याची माहिती सांगली पोलिसांनी दिली आहे.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बाज या गावात उसाच्या शेतात शेतकऱ्यांनी गांजाची लागवड केली होती. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली. त्यावेळी त्यांना उसाच्या शेतातून तब्बल वीस किलो ओला गांजा सापडला. त्याची अंदाजे किंमत साडे पाच लाख रुपये आहे. याप्रकरणी शेतकरी बाबू पांडुरंग खरात यांना सांगली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या संपूर्ण शिवाराची पोलिस चौकशी करीत आहेत.

🤙 9921334545