जाणीव फौंडेशन व प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांचे संयुक्त विद्यमानाने शैक्षणिक साहित्य वाटप

कोल्हापूर : जाणीव फौंडेशन व प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांचे संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी शाहु स्मारक भवन, काॅन्फरन्स हाॅल येथे मुलांना शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी शितल धनवडे प्रेस क्लब अध्यक्ष, माजी प्राचार्य प्रदीप गबाले, उद्योजक अभय देशपांडे, प्रतिष्ठित व्यावसायीक आशिष तुरकीया, डाॅ.ॠषाली कदम वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी यांचे शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमास अनेक दानशुरांनी सहकार्य केले व आशिष जी तुरकीया यांनी मुलांना सॅक दिले तर मुलांना दुपारच्या जेवणासाठी हिलींग फौंडेशन ऑफ महाराष्ट्र यांचेकडून देण्यात आले निवेदन अश्विनी टेंबे यांनी केले प्रास्ताविक व स्वागत सुषमा बटकडली यांनी केले व कार्यक्रमाचे आभार रघुनाथ पाटील यांनी मानले.

🤙 9921334545