‘ त्या ‘ वडापाव सेंटर चालकाचे अखेर पालकमंत्र्यांना साकडे

कोल्हापूर : महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून १० ऑगस्ट रोजी झालेल्या कारवाई प्रकरणी राजेश मोटर्स परिसरातील संतोष टी स्टॉल या वडा-पाव सेंटरचे चालक दत्तात्रय अत्याळकर यांनी आज सोमवारी कोल्हापूर दौ-यावर आलेले पालकमंत्री दिपक केसरकर यांची भेट घेऊन या कारवाई विरोधात त्यांच्या कडे साकडे घालत दाद मागितली.

यावेळी सदर वडा-पाव सेंटर लगत बांधकाम सुरू असलेल्या बिल्डरशी साटेलोटे असल्याने महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने दबावापोटी सनदशीर मार्गाने सुरू असलेल्या वडा-पावसेंटर विरोधात कारवाई केल्याचा आरोप माजी महापौर सुनील कदम यांनी पालकमंत्री केसरकर आणि जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. महेंद्र पंडित यांच्याशी बोलताना केला. महानगरपालिकेच्या जागेचा असेसमेंट उतारा असताना सनदशीरपणे आपला व्यवसाय करणा-या अत्याळकर यांच्या विरोधात कारवाई करणारी महापालिका यंत्रणा महापालिकेच्या टीपी रोडवर तब्बल सहा मीटर अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्या संबंधित बिल्डरच्या अतिक्रमणाकडे ‘सोयिस्करपणे दुर्लक्ष करत असल्याकडे त्यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. सामाजिक कार्यकर्ते अमीन शेख यांनी सदर बिल्डरने महापालिका उद्यान विभागाची परवानगी घेता सदर जागा पत्र्याने बंदिस्त करून अशोक वृक्षांची बेकायरा तोड केल्याची माहिती पालकमंत्र्यांना दिली. बिल्डरकडून अतिक्रमित जागेवर रखवालदार केबिन, स्वयंपाकघर आणि मिक्सर प्लॅटसह सिमेंट गोड़ावून उभे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात पालकमंत्र्यांनी आयुक्त तथा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याशी चर्चा करून अत्याळकर यांच्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन माजी महापौर कदम यांना दिले.यावेळी अंजली परीख, डॉ. बिपीन परीख, विक्रांत अत्याळकर, आनंद जाधव, प्रमोद बनसोडे, विठोबा वरेकर, सुनील शहापूरे, बाळासाहेब पाटील, तुकाराम साबळे उपस्थित होते.

🤙 8080365706