शाहूपुरी पोलिसांकडून बोगस अँटी करप्शन अधिकारी यांना अटक

कोल्हापूर : राजापूर येथील डॉ. सुभाष अण्णाप्पा डाक वय वर्ष 55 मुक्काम पोस्ट कनेरी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी अँटी करप्शन अधिकारी आहे. असे सांगत तुमचे वैद्यकीय व्यवसायाचे प्रमाणपत्र बोगस आहे. तुमच्यावर कारवाई करायचे आहे. असे सांगून दवाखान्यातून इनोवा कारमधून कोल्हापूर येथे आणून मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे आणून तडजोड करत असता 112 येथे कॉल आल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी जाऊन सदर व्यक्तींना ताब्यात घेतले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टक्के यांचे सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय श्वेता पाटील स. फौजदार संदीप जाधव,बाबा ढाकणे,रवी आंबेकर,शुभम संकपाळ, लखन पाटील, संदीप बेंद्रे, कार्वेकर, सुर्वे आदींनी सहभाग घेतला.पुढील तपास स.पो.नि.शीतल कुमार कोल्हाळ हे करीत आहेत.

🤙 8080365706