इंडो काउंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटला

कागल : एमआयडीसी गोकुळ शिरगाव येथील इंडो काउंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागणीसाठी संप पुकारला होता. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी कामगारांच्या या प्रश्नात जातीने लक्ष घातले. अखेर 50 दिवस चालेलेला संप राजे समरजीतसिंह घाटगे यांच्यापुढाकार,पाठपुरावा व मध्यस्थी ने योग्य समन्वयाने मिटला आहे.

कंपनी आणि कामगारांच्या हिताच्या दृष्टीने हा संप मिटला पाहिजे, यासाठी राजे समरजीत आग्रही होते. कामगारानीही राजेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना मध्यस्थीचे अधिकार दिले होते. त्यानुसार त्यांच्या मध्यस्थी व पाठपुराव्याला यश आले. व्यवस्थापन आणि कामगार यातील वाद संपुष्टात आला असून त्याप्रमाणे सामंजस करार ही झालेला आहे. येत्या 7 सप्टेंबर पासून कंपनी पूर्वरत सुरू होणार आहे.यावेळी बोलताना कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर कमल मितरा म्हणाले, समरजीतराजे यांच्यासारख्या प्रामाणिक आणि चांगल्या नेतृत्वाच्या माध्यमातून हा संप मिटला आहे. व्यवस्थापन आणि कामगार यांच्यामध्ये समन्वयाने त्यांनी हा संप मिटवला आणि तात्काळ कंपनी सुरू करणेबाबत पुढाकार घेतला याबद्दल श्री घाटगे यांना धन्यवाद देतो.जे काही झाले ते कामगार आणि विसरून जावे . सामंजस करारानुसार कर्मचाऱ्यांना सर्वकाही देण्यात येईल, कामगारानी कंपनीला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावा. कामगारांना जे काही सहकार्य लागेल ते आम्ही नक्की करू. प्रतिक्रिया देताना राजे म्हणाले, संप मिटवण्यासाठी व समन्वयाने तोडगा काढण्यासाठी व्यवस्थापन, आणि कामगार यांनी चांगले सहकार्य केले.ज्याच्यावर कामगारांची उपजीविका सुरू असते ते कारखाने किंवा त्या संस्था टिकल्या पाहिजेत ही स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांची आम्हाला शिकवण आहे. यातूनच कंपनी लवकर चालू व्हावी यासाठी मी प्रयत्नशील होतो. यापुढे व्यवस्थापन आणि कामगार यांनी ” विश्वासाने “आपले नाते जपा एकही दिवस कंपनी बंद नाही पडली पाहिजे याची दक्षता घ्या .जर काही बंदच पाडायचे असेल तर अदृश्यपणे होणारी खंडणी, एजंटगिरी या गोष्टी बंद पाडा.

यावेळी युवा उद्योजक व समन्वय समितीचे प्रमुख जयवंत रावण यांनी आपल्या मनोगतात कंपनी आणि कामगारांचा भविष्याचा प्रश्न समन्वयाने सोडवल्याबद्दल राजे समरजीतसिंह घाटगे व कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले.यावेळी शैलेश सरनोबत, एच आर मॅनेजर शशिकांत माने,अरुण गुरव,चेतन भगले, एडव्होकेट.आर डी पाटील, भिकाजी भोसले व्ही पी पाटील संताजी घोरपडे, अरुण जकाते, बाळासाहेब पाटील, नामदेव खरांबळे. भरत बोरे , श्रीकांत भावे,शिवाजी पाटील शिवाजी कुंभार तुकाराम चौगुले सतीश कोंडेकर रमेश पाटील किसन कोथळे, आदी उपस्थित होते.

समाजाला अशा नेतृत्वाची गरज

यावेळी कामगाराच्या वतीने बोलताना भिकाजी भोसले म्हणाले, इतर अनेक कामासाठी अनेक नेते एमआयडीसीत येत असतात परंतु समरजीत राजे आमच्या कामगारांच्या प्रश्नासाठी दोन-तीन वेळा कंपनीच्या ऑफिसमध्ये,गेटवर आले. निस्वार्थी व निरपेक्ष वृत्तीने आम्हा कामगारांना न्याय मिळवून दिला. अशा नेतृत्वाची आज समाजाला खरी गरज आहे.