
नवी दिल्ली- भारत १०० व्या स्वातंत्र्यदिनी एक विकसित आणि प्रगत राष्ट्र असेल. तसेच देशात भ्रष्टाचार, जातीवाद, जमातवाद याला कोणतीही जागा नसेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारत देश २०४७ मध्ये विकसीत देश असेल, असं मोदी मुलाखतीमध्ये म्हणाले.भारतात ९ आणि १० सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये जी-२० ची शिखर परिषद होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी याविषयी भाष्य केलं. जग भारताला मार्गदर्शकाच्या रुपात पाहात आहे. आपले शब्द आणि ध्येय जगाकडून भविष्यातील दिशादर्शकाच्या स्वरुपात पाहिले जात आहेत. आता या केवळ कल्पना राहिलेल्या नाहीत. जगाला आपल्याकडून आशा आहेत, असं मोदी म्हणाले.
