अल्पवयीन मुलांकडून तरुणाची हत्या

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून पाच अल्पवयीन मुलांनी एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

हडपसरमधील रामटेकडी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एक ते तीनच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे. महादेव रघुनाथ मोरे (वय २६, रा. काळेपडळ, हडपसर) असे मृत तरुणाचे नाव आहे. वानवडी पोलिसांनी याप्रकरणामध्ये ५ अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

🤙 8080365706