जालना आंदोलन चिघळले: बसेसची तोडफोड आणि जाळपोळ

मुंबई- जालन्यातील लाठीमाराच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तब्बल १९ बसेसची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आल्याची माहिती आहे. एसटी महामंडळाचे जवळपास ४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे महामंडळातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

रविवारीही जालन्यात वातावरण तणावाचे असल्याने जालन्यातील बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे.जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक उपोषणासाठी बसले होते. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान लाठीमारामध्ये झाले. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीमारामुळे राज्यातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

🤙 8080365706