नरेश गोयल यांना अटक

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने जेट एअरवेज लिमिटेडचे ​​संस्थापक नरेश गोयल यांना बँक फसवणुकीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. त्यांच्यावर 538 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. ७४ वर्षीय गोयल यांना आज (२ सप्टेंबर) विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले जाणार आहे. ईडी त्यांच्या कोठडीची मागणी करणार आहे.

गोयल यांना शुक्रवारी ईडीच्या मुंबई कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. प्रदीर्घ चौकशीनंतर त्यांना प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यान्वये (पीएमएलए) अटक करण्यात आली. यापूर्वी दोनदा ईडीने बोलावल्यानंतर ते हजर झाले नव्हते.केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या वर्षी मे महिन्यात नोंदवलेल्या एफआयआरवर हे प्रकरण आधारित आहे. नरेश गोयल यांची पत्नी अनिता, जेट एअरवेज एअरलाइन्सचे माजी संचालक गौरांग आनंद शेट्टी आणि अन्य काही जण या प्रकरणात आरोपी आहेत.

🤙 8080365706