यिन चा रक्षाबंधन सोहळा वाहतुक पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहवासात….!!

पत्रकार : नामदेव निर्मळे

इचलकरंजी: जे कायम आपल्या साठी अहोरात्र जागून आपलं कर्तव्य पार पाडत असतात आपलं रक्षण करत असतात त्यांच्यासाठी ‘एक राखी रक्षणाची’ या उपक्रमाखाली इचलकरंजी मधील वाहतूक नियंत्रण कक्षा मध्ये यिन चा रक्षाबंधन पार पाडलं गेलं.

या प्रसंगी उपनिरीक्षक काकतकर म्हणाले “आम्ही तुमच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहे तुम्ही स्वतःच रक्षण करण्यासाठी स्वतःला एक नियमांची राखी बांधून घ्यावी व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.”यिन अध्यक्ष अमन पटेल यांनी सर्वांचे आभार मानले व म्हणाले की सर्व वाहतूक नियंत्रक सदैव ऊन वारा पाऊस न पाहता आमच्या रक्षणासाठी पुढे असतात त्यासाठीच ‘एक राखी रक्षणाची’ हा उपक्रम आम्ही या ठिकाणी घेतला या कार्यक्रमासाठी पोलीस उपनिरीक्षक भरत काकतकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक हिंदुराव चरापले, संजय जाधव, विजय जाधव, हेड कॉन्स्टेबल गुरुनाथ चव्हाण, मारुती पाटील, संजय फडतरे, सागर पाटील कॉन्स्टेबल आशिष मादनाईक, वसंत पाटील, संदीप पाटील हे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन सकाळ यिन विभागाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्हा यिन सरचिटणीस साईनाथ मोहिते, यिन अध्यक्ष अमन पटेल, यिन अध्यक्षा सानिया जुबेर जमादार, यिन उपाध्यक्षा सिमरन शेख,यिन उपाध्यक्ष युसुफअली इनामदार,यिन क्लब सदस्या सानिया मुल्ला, प्राजक्ता वनकुंद्रे, शिवानी सूर्यवंशी, स्नेहल चव्हाण उपस्थित होते.

🤙 8080365706