सागरा प्राण तळमळला नाट्यप्रयोगास उस्फुर्त प्रतिसाद

कोल्हापूर : स्वातंत्रवीर सावरकरांचे विज्ञानवादी, देशप्रेम आणि हिंदुत्वाचे विचार आपल्यामध्ये नेहमीच उत्साह आणि देशप्रेम जागवतात. अत्यंत प्रेरणात्मक विचार स्वातंत्रवीर सावरकरांनी रूजवले याच विचारांचा जागार “हर घर सावरकर” या संकल्पनेतून करण्यात येणार आहे. या संकल्पनेतून स्वातंत्रवीर सावरकरांच्या देशभक्तीचे विचार घराघरात पोहचविण्यात येणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम शिवसेना- भाजप युतीच्या वतीने राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आज “संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर” येथे “सागरा प्राण तळमळला” या नाट्यप्रयोगास कोल्हापूरवासियांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

प्रचंड संख्येने हा प्रयोग हाऊसफुल्ल झाला. प्रयोगादरम्यान हिंदुत्ववादी, सावरकर प्रेमी आणि नाट्य रसिकांचा प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता.स्वातंत्रवीर सावरकर यांचे विचार घरोघरी पोहचवणे या प्रामाणिक जाणीवेतून ही मोहीम सुरु आहे. हिंदुत्व आणि सावरकर फक्त एखाद्या प्रसंगापुरते राजकारणासाठी वापर न करता एखादे व्रत घेतल्याप्रमाणे स्वातंत्रवीर सावरकर यांच्या विचारांचा जागर सुरूच आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या संयोजनातून हा उपक्रम पार पडला.

नाट्यप्रयोगाचे दीपप्रज्वलन जेष्ठ हिंदुत्ववादी बाबा वाघापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, जिल्हाप्रमुख रवींद्र माने, युवासेना कोल्हापूर, हातकणंगले अध्यक्ष ऋतुराज क्षीरसागर, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव,भाजप माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, तुकाराम साळोखे, महिला आघाडीच्या मंगल साळोखे, अमरजा पाटील, पूजा शिंदे, शाहीन काझी, हिंदुत्ववादी संघटनेचे शिवानंद स्वामी, दीपक देसाई, राजेंद्र जाधव, अर्जुन आंबी उपस्थित होते.

🤙 9921334545