मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त शालेय साहित्य वाटपाचे आयोजन

कोल्हापूर : मराठा सेवा संघ 36 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे. या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार ( दि.1 सप्टेंबर ) रोजी दुपारी 3.30 वाजता कोल्हापूर महानगरपालिका शेठ रामनारायण रुईया विद्यालय क्र. 19 रविवार पेठ येथे मराठा सेवा संघाच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

यामध्ये ई लर्निंगसाठी 2 एलईडी टीव्ही ,सर्व वर्गामध्ये शालेय अभ्यासक्रमाचे डिजिटल, सर्व विद्यार्थ्यांना सॅंडल, वही, ड्रॉइंग बुक इत्यादी साहित्याचा समावेश असणार आहे.अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, कोल्हापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त केशव जाधव ,कोल्हापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उत्पादन शुल्क अधीक्षक रवींद्र आवळे, महावितरण अधीक्षक अभियंता अंकुश कावळे, सीनिअर आरटीओ विजयसिंह भोसले या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

यावेळी या कार्यक्रमास विभागीय अध्यक्ष अश्विनकुमार वागळे, जिल्हाध्यक्ष महिपती बाबर, तसेच पदाधिकारी संजय पाटील, चेतन आरमाळ, सुरेश पाटील ,सुशांत निकम, प्रवीण पाटील, विनायक पाटील ल, संजय रणदिवे, विनायक ल.पाटील, संजय काटकर, अजय शिंदे, शहाजी देसाई, रुपेश पाटील, चारुशीला पाटील, निलेश सुतार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

🤙 9921334545