राष्ट्रवादीच्या प्रमुख नेते मंडळींकडून तपोवनची पाहणी

कोल्हापूर:महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांचा कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने “सत्कार आणि उत्तरदायित्व सभा” रविवार दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी कोल्हापुरात होणार आहे. पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी मंत्री व खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी चार वाजता तपोवन मैदानावर होणाऱ्या या सभेला एक लाखाहून अधिक उपस्थित जमविण्याचा संयोजकांचा संकल्प आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेतेमंडळींनी तपोवन मैदानाची पाहणी केली.

एक लाख कार्यकर्ते पदाधिकारी, मान्यवर नेतेगण, मंञी गण यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे. त्याची पुर्वतयारी व नियोजनासाठी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंञी हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली आज तपोवन मैदानाची पाहणी करण्यात आली. केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, औषध व प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ. रुपाली चाकणकर या प्रमुखांसह राज्यभरातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, स्थायी समितीचे माजी सभापती राजु लाटकर, केडीसीसी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोल्हापूर शहराध्यक्ष आदिल फरास, पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, कागल तालुकाध्यक्ष विकास पाटील-कुरुकलीकर, टीडीसीसी बँकेचे माजी संचालक असिफ फरास, विनायक फाळके, हरुण मुजावर, मुन्ना शानेदिवाण, करवीर सरचिटणीस शहाजी जठार यांचेसह मान्यवर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.