
कोल्हापूर : बांधकाम कामगार नोंदणी व फेर नोंदणी वेळेत करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटित कामगार विभागातर्फे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. संघटनेचे अध्यक्ष नितीन मस्के यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. जिल्ह्यातील बांधकाम कामगार वीट भट्टी कामगार सेंट्रींग कामगार हे ऊन पाऊस याची तमा न करता काबाडकष्ट करतात.
या कामगारांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा म्हणून ऑनलाईन नोंदणी करीत आहेत. पण ही नोंदणी वेळेत होत नाही तसेच फेर नोंदणीस विलंब लागतो.यामध्ये कामगारांचा दोन-तीन महिन्याचा वेळ वाया जातो. तरी कामगार नोंदणी व फेर नोंदणी त्वरित करा या मागणीसाठी हे आंदोलन केले सहाय्य कामगार आयुक्त अजित घोडके यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनात देवानंद गायकवाड सरदार वाघमारे विक्रांत गुरव प्रकाश जोशी केदारी पाटील राजू पाटील संदीप साळुंखे गिरीश पाटील यांनी सहभाग घेतला.