भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना ऑनलाईन गेमची जाहिरात करणं महागात पडणार….

मुंबई : ऑनलाइन गेमच्या जाहिरातीमधून युवा वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. ऑनलाइन गेमच्या जाहिराती बंद केल्या पाहिजेत, यासाठी प्रहारचे आमदार बच्चू कडू हे मागील काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. दरम्यान, ऑनलाइन गेमच्या जाहिराती बंदी घालावी अशी मागणी कडू यांनी केली होती. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना ऑनलाईन गेमची जाहिरात करणं महागात पडणार असल्याची चिन्ह दिसत आहे. कारण बच्चू कडू सचिन तेंडुलकर यांना 30 तारखेला वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावणार आहे. तसेच आंदोलनचा देखील कडूंनी इशारा दिला आहे.

दरम्यान, ऑनलाइन गेमच्या जाहिरातीवरुन कडू आक्रमक झाले असून, सचिनला सांगूनही सचिनने ऐकले नाही, म्हणून बच्चू कडू सचिन तेंडुलकर यांना वकिलांमार्फत नोटीस बजावणार आहे. 30 ऑगस्ट रोजी बच्चू कडू ही नोटीस तेंडुलकर यांना पाठवणार आहेत. काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचं कडूंनी म्हटलं होतं. यानंतर ते आता सचिनला नोटीस पाठवणार आहेत.