
कोल्हापू: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर खासदार शरद पवार हे पहिल्यांदाच कोल्हापूरच्या दौऱ्यावर आज आहेत. कोल्हापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मागणीवरून येथे दौरा आखला आहे. तर पवार यांची उद्या येथील ऐतिहासिक दसरा चौकात सभा होणार आहे.
याच्याआधी त्यांनी नाशिक आणि बीडमधील सभेतून थेट अजि पवार गटावर निशाना साधला होता. त्यामुळे या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर कोल्हापुरात होणाऱ्या सभेची तयारी झाली असून या सभेला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार आहेत. शुक्रवारी (दि. २५) येथे दसरा चौकात सायंकाळी पाच वाजता सभा होणार असल्याने दसरा चौकात मोठं मोठं फलक लागले आहेत. त्या फलकांवर बाप बापच असतो आणि योद्धा पुन्हा मैदानात असे आशयाचे फलक लागले आहेत.