दिग्गज अभिनेत्री सीमा देव यांचं निधन

मुंबई : मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या दिग्गज अभिनेत्री सीमा देव यांचं निधन झालं आहे. त्या 81 वर्षांच्या होत्या.

गेल्या काही काळापासून त्यांना अल्जायमर होता. 2020 मध्ये त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देवने सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली होती. तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रमेश देव यांचं निधन झालं होतं. हृदयविकाराच्या झटक्यानंतर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

सीमा देव यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राजा परांजपे दिग्दर्शित ‘जगाच्या पाठीवर’ (1961) या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. ‘सुवासिनी’, ‘आनंद’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.

🤙 9921334545