अँड सुशांत पाटील व डॉ. संजय पाटील साहेब यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साह संपन्न……

पत्रकार : नामदेव निर्मळे

कुरुंदवाड तालुका शिरोळ येथे सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हिंदुस्थान हा कृषिप्रधान देश आहे. देशातील शेतकरी सुखावला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान योजना,किसान पेन्शन योजना अमलात आणून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत शेतकऱ्यांच्या स्वप्नातला हिंदुस्थान साकारला आहे. श्रीमंता बरोबरच सर्वसामान्यांचे हित जोपासणारा भारतीय जनता पक्ष 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत सत्तेची हॅट्रिक करणार असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी केले.

येथील वृंदावन मंगल कार्यालय येथे रविवारी भाजपाचा कार्यकर्ता मेळावा व डॉ संजय पाटील यांची केंद्रीय महामंडळावरती संचालकपदी निवड झाल्याबद्दल आणि महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाच्या सचिव पदी अँड सुशांत पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार या संयुक्त कार्यक्रम प्रसंगी माजी आम. हळवणकर बोलत होते.मिश्रीलाल जाजू,खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष हिंदुराव शेळके,माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, जि प सदस्य विजय भोजे,डॉ.अशोकराव माने आदि प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ.पाटील म्हणाले सोसायटीच्या निवडणुकीपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत सर्वच निवडणुकीत कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा आदेश मानून केलेल्या कार्यामुळेच भाजपाचा झेंडा शिरोळ तालुक्यात सन्मानाने फडकत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा भाजपाचा झेंडा फडकवतील असा विश्वास व्यक्त केला.यावेळी जाजू, शेळके,भोजे, डांगे आदींची भाषणे झाली. डॉ.संजय पाटील, अँड.सुशांत पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी अनेक गावचे सरपंच बुथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.आभार मेजर सुनील पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन उमेश संभूशेटे अरुण चव्हाण सचिन गवळी अजित बुबने अनिल शिंदे यांनी केले.