
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका आयुक्तपदी के मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती झाली आहे. त्या उद्या बुधवार (दि.२३ ऑगस्ट) आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील.
कोल्हापूर महापालिकेतील आयुक्त पद २ जून पासून रिक्त आहे. अखेर मंजू लक्ष्मी यांची आयुक्तपदी निवड झाली आहे.कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी अखेर के मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने त्यासंदर्भात आज (मंगळवार) सकाळी आदेश काढले. के मंजुलक्ष्मी या सध्या सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
