
कोल्हापूर : आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या एक कोटींच्या निधीतून वळीवडे येथे विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील वळीवडे येथील हुल्ले कॉर्नर भागातील रस्ता रुंदीकरण आणि चॅनल गटर्स या विकासकामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाला. वळिवडे गावाच्या सरपंच रुपाली कुसाळे व महिला सदस्यांच्या हस्ते जेसीबी मशीनचे पूजन करण्यात आले. यावेळी शेती सेवाश्रम सोसायटीचे नूतन चेअरमनसर्जेराव चव्हाण, व्हाईस चेअरमन उत्तम शिंगे यांचा आमदार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, गावाला जोडणारा प्रमुख रस्ता मोठा व चांगला असावा यादृष्टीने या कामाची सुरुवात झाली आहे. कोरोनाचे संकट व त्यानंतर अनेक कामांना नवीन सरकारने खो घातला, त्यामुळे कोर्टाच्या माध्यमातून अनेक कामांची स्थगिती उठवावी लागली. आता मात्र विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. सरपंचानी वार्ड निहाय प्रश्नांचा आढावा घ्यावा, कामांची यादी करा, ही सर्व कामे वर्षभरात आराखडा तयार करून पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी बोलताना सरपंच रुपाली कुसाळे यांनी, गावाच्या सर्वांगीण विकासाठी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदैव प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली. यावेळी उपसरपंच अर्जुन गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य अविनाश साळोखे, सदस्या रंजना निचिते, वंदना जाधव, जहिदा इनामदार, राजगोंडा वळिवडे, सुभाष इंगवले, प्रल्हाद शिरोटे, रणजितसिंह कुसाळे, किशोर कुसाळे, राजू वळिवडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
