लंपी बाधित जनावरांना अनुदान देण्याची मागणी

कोल्हापूर : लंपिने बाधित झालेल्या गाई पूर्ववत दुधावर येण्यासाठी वर्ष- दीड वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे पशुवैद्यकीय तज्ञांचे मत आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे नुकसान होणार असून लंपिची लागण झालेल्या गायींनाही शासनाने अनुदान द्यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे राधानगरी तालुकाध्यक्ष तथा गोकुळचे संचालक प्रा. किसनराव चौगले यांनी अजित पवार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच लंपिने मयत झालेल्या आणि लाखावर रुपयांच्या किंमती असलेल्या गाय- बैलासाठी पंचवीस -तीस हजार रुपये ही भरपाई तुटपुंज असून शासनाने भरपाईची रक्कम दुप्पट करावी अशीही मागणी प्रा.चौगले यांनी केली आहे. जिल्ह्यात लंपिचा प्रादुर्भाव वाढत असताना जि.प.च्या बहुतांश पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याचे आणि औषध पुरवठाही अपुरा असल्याचे ना.पवार यांच्या यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. या वेळी अवि पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती मोहन पाटील, संतोष धुमाळ आदी लोकप्रतिनिधी ही उपस्थित होते.