पोलीस मुख्यालयातील अलंकार हॉल येथे भव्य निबंध व चित्रकला स्पर्धा संपन्न

कोल्हापूर : आज अलंकार हॉल पोलीस मुख्यालय कोल्हापूर येथे करवीर पोलीस ठाणे अंतर्गत भव्य निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करवीर पोलीस ठण्याच्या वतीने करण्यात आले होते.

या स्पर्धेस विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या निबंध व चित्रकला स्पर्धे करिता लहान गट पाचवी ते सातवी, मोठा गट आठवी ते दहावी अशा प्रत्येकी दोन्ही गटात एकूण 152 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

या स्पर्धा मुलांच्या चांगल्या वागण्या बरोबरच त्यांच्याकडील कौशल्यांना, गुणवत्तेला, कला गुणांना वाव मिळण्याकरता, तसेच त्यांचे विचार जाणून घेऊन पोलीस जनता संवाद दृढ होण्याकरिता स्पर्धा आयोजित करून त्याचे विषयही वास्तविकतेवर आधारित व सद्य, व भविष्यातील परिस्थितीची गरज ओळखून असे ठेवण्यात आले होते. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन, त्यांच्याशी संवाद साधून, त्यांना शुभेच्छा देऊन गौरवण्यात आले.

यावेळी गोपनीय अंमलदार अविनाश पोवार, सुहास पोवार, सचिन जाधव, परीक्षक शालेय शिक्षक वर्ग, पालक, पोलीस मित्र यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

🤙 8080365706