पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या परिषदेत पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. ब्रिक्स परिषद ही 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये पार पडणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी शुक्रवारी (25 ऑगस्ट) रोजी ग्रीसला भेट देतील. 40 वर्षांनंतर भारताच्या पंतप्रधानांचा ग्रीस दौरा या निमित्ताने होणार आहे.

🤙 8080365706