गगनबावडा भाजपा तालुका अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच ….. स्वप्नील शिंदे अग्रस्थानी

साळवण प्रतिनिधी : एकनाथ शिंदे

गगनबावडा तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या नवीन कार्यकारिणी करिता व पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

विद्यमान तालुकाध्यक्ष संदीप पाटील यांनी गेल्या सहा वर्षांच्या काळात अतिशय शिस्तबद्ध आणि पक्षाच्या आदेशांचे तंतोतंत पालन करून आपल्या कामाची छाप जिल्हा आणि राज्य पातळीवर पाडली आहे. साहजिकच त्यांच्या शब्दाला पक्ष्यात मोठा मान आहे. ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद यासह विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही त्यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. तलुक्यात भाजपा मधे सध्या दोन गट पडले आहेत.

जिल्हा पातळीवर राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व केलेल्या एका माजी महिला प्रतिनिधीने आपल्या मर्जीतील कार्यकर्त्याला तालुकाध्यक्ष करावं म्हणून खासदार महाडीकांसह भाजपच्या लॉबिशी सम्पर्क साधला आहे. अनिल पडवळ, शशांक पारगावकर, सरदार खाडे, सचिन जाधव, सूरज पाटील यांची नावे चर्चेत आली असताना या सर्वांना मागे टाकत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी जी शिंदे यांचे सुपुत्र व ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव स्वप्नील शिंदे यांनी आघाडी घेतली आहे.

तालुक्याचे नेते असणाऱ्या पी.जी.शिंदे यांच्या बद्दल आज ही समाजात आदराची भावना कायम आहे .प्रत्येक गावात त्यांचा गट आहे. तालुका कार्यक्षेत्रात असणारा त्यांच्या जनसंपर्क तीसंगी येथील महाविद्यालय धामणी खोऱ्यातील शेलोशी येथील मध्यामिक शाळा तालुका संघ आणि युवकांचे नेटवर्क याचा फायदा भाजपला इतर उमेदवारांपेक्षा अधिक प्रमाणात होणार आहे. बाकीच्या उमेदवारांच्या तुलनेत स्वप्नील शिंदे उजवे ठरत असल्याने तालुका अध्यक्ष पदावर त्यांची निवड योग्य ठरणारी आहे अश्या प्रतिक्रिया राजकीय जाणकार मधून उमटत आहेत.