लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने मोर्चेबांधणी सुरू

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने मोर्चेबांधणी सुरू केली असून ठाणे जिल्ह्यातील तीन आणि पालघर जिल्ह्यातील एक अशा चार जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे शहरात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातही उमेदवार देण्याच्या तयारी मनसे आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांची महायुतीत राज ठाकरे सहभागी होणार नसल्याचं यावरून संकेत मिळत आहेत. तर ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात राज ठाकरे सर्वच ठिकाणी उमेदवार देणार असल्याने याठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

🤙 8080365706