न्यूज मराठी २४पत्रकार मोहन कांबळे यांना छत्रपती शिवराय राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

कोल्हापूर: आम्ही भारतीय महिला मंच व धम्म भवन ट्रस्ट यांच्यामार्फत देण्यात येणारा पहिला छत्रपती शिवराय विचार प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार, बालिंगा ता. करवीर येथील सामाजिक कार्यकर्ते व निवृत्त शासकीय कर्मचारी व न्यूज मराठी २४चे पत्रकार मोहन दिनकर कांबळे यांना जाहीर झाला आहे.

अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. करुणा विमल यांनी दिली. या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे छत्रपती शिवराय विचार जागर परिषदेत मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी चंद्रकांत फडतरे अध्यक्ष शिवराय स़घटना, कृष्णात पाटील विचारवंत व साहित्यिक एडवोकेट मंचरकर डोने उपस्थित राहणार आहेत.