कोल्हापूर : जाणीव फौंडेशन हि २०११ पासून HIV सह जीवन जगणाऱ्या महिला व मुलांच्यासाठी कार्यरत असून संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नसून हे सर्व उपक्रम लोकसहभागातून अविरत पणे सुरु आहेत. यावेळी संस्थेने स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला. यावर्षी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गार्डन क्लब कोल्हापूर मार्फत द वडगाव येथे माहेर प्रतिज्ञा निवारा सेंटर येथे वेगवेळ्या प्रकारची झाडे उपलब्ध करून दिली.
या प्रसंगी गार्डन्स क्लब कोल्हापूर चे अध्यक्षा कल्पना सावंत तसेच सुप्रिया भस्मे, शैला निकम, संगीता कोकितकर व जाणीव संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. जाणीव संस्थे कडून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी यावेळी खारीचा वाटा उचलण्यात आला.
संस्थेकडुन विनाअनुदानित पुरविल्या जाणारया सेवाची माहिती खालील प्रमाणे :
१) मानसिक आधार देणे. शासकिय रुग्णालयात ए. आर. टी. चालु करणेसाठी मदत.
२) संजय गांधीवालसंगोपण यासाठी योग्य कागदपत्रांची माहिती व मार्गदर्श न.
३)गेली सहा वर्षे गरजु मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप. गेली वर्षे कपडे वाटप.
४) एच. आय. व्ही. सह जगणारया गरजु मुलांना कडधान्य वाटप.
५) महिलांसाठी बचत गट.
६) आपले अधिकार व स्वावलंबी जीवन व लघु उदयोग याबददल माहिती.
७) आपल्याला जे भोगायला आले ते दुसरयाला येऊ नये यासाठी स्वावलंबी बनविनेसाठी कार्यशील.
८) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण माध्यमातुन कायदेविषयक विना मोबदला सल्ला मार्ग दर्शन व मोफत वकिल
९) अडचणीच्या काळात व शिक्षणासाठी राहण्याची व शिक्षणासाठी मदत
१० ) लॉक डाऊन पासून सी. पी. आर. हॉस्पीटल येथे आठवड्यातून दोन दिवस लांबून येणाऱ्या पेशंट साठी अन्नदान वाटप वाटप करत आहोत.