दहिवडी – महाराष्ट्र राज्यातील सर्व निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त नावापुरते मुख्यमंत्री आहेत. फडणवीस सांगतील तसे वागावे लागते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस हातातील बाहुले आहे, अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
कॉंग्रेसतर्फे दहिवडी येथे आयोजित माढा लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी कसबा (पुणे) मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, आयोजक रणजितसिंह देशमुख, सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते- पाटील, सुरेश चव्हाण, विश्वंभर बाबर, श्रीरंग चव्हाण, उदयसिंह पाटील, राजेंद्र शेलार, भानुदास माळी, महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पना यादव, जाकीर पठाण, जगन्नाथ कुंभार, अमरजीत कांबळे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.