
कोल्हापूर : कसबा बावड्यातील शिये रोडवर असलेल्या श्रीराम पेट्रोल पंपाजवळ केटीएम दुचाकीने ठोकल्याप्रकरणी क्रमांक के. ए -२९-EC- ३४६४ या दुचाकी वरील अज्ञात चालकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याप्रकरणी वैभव विष्णू पाटील (वय २८ )रा.कसबा बावडा यांनी शाहूपुरी पोलिसात वर्दी दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान कोल्हापूर ते शियेकडे जाणाऱ्या रोडवर सरस्वती बाबुराव मोरे (वय ७१) वृद्ध महिला रोडवरून चालत जात होत्या .यावेळी शियेच्या दिशेने जाणाऱ्या केटीएम दुचाकीने दुचाकी स्वाराने पाठीमागून धडक दिली.
यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचाराकरिता हिरा नर्सिंग होम येथे दाखल करण्यात आले असून दवाखान्याकडून शाहूपुरी पोलीस ठाणे येथे वर्दी देण्यात आली आहे .प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.