या वर्षातील सर्वात मोठा जोक : जितेंद्र आव्हाड

ठाणे : विजय वडेट्टीवार काय म्हणाले याच्यावरती मी स्पष्टीकरण द्यावं, हे हास्यास्पद होईल. पण शरद पवारांना कोण ऑफर देऊ शकतो हे म्हणजे या वर्षातील सर्वात मोठा जोक आहे! असं वक्तव्य राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

त्यांची उंची किती. त्यांची लोकसभेतील कारकीर्द किती आणि त्यांना कोण ऑफर देणार, जे कोणी काय बोलतात ते बोलू देत. पवार साहेबांनी सांगोल्याच्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं आहे की मी कुठेही जाणार नाही. मी जातीयवादी पक्षाची हात मिळवणार नाही. मी पुरोगामी विचारांचा पुरस्कार करता आहे. मी तेच विचार पुढे घेऊन जाणार आहे, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीच्या मागेपुढे संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करणं, हेच एक उद्दिष्ट आहे. बोलणाऱ्यांचं शरद पवार कोणाच्या ऐकायला बसलेत का तुमच्या घरात राजकारण सुरुवातीपासून चालत आलेला आहे, त्यामुळे त्यांच्या विचारधारेत फरक पडलेला नाही. ते पुरोगामी विचार घेऊनच चाललेत यापुढे पुरोगामी विचार घेऊनच चालतील, असा विश्वासही जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार शरद पवार भेटीवर भाष्य केलं. शरद पवार हे सोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री करू अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अट असावी. त्यामुळेच अजित पवार शरद पवार यांची भेट घेत असावेत, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत. त्याला जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे.