आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

कर्क : आरोग्य उत्तम राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

तुळ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृश्‍चिक : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

धनु : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

कुंभ : हितशत्रुंचा त्रास संभवतो. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल

मीन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.