निराधार लाभार्थी च्या चेहऱ्यावरील समाधान व आशीर्वाद हीच आमच्यासाठी लाल दिव्याची गाडी: राजे समर्जीतसिंह घाटगे

कागल :शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर येताच सात आठ महिन्यात एक हजार हून अधिक लाभार्थ्यानाइंदिरा गांधी, संजय गांधी, श्रावण बाळ, योजनेचा लाभ मिळवून देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत. कोणतीही कपात न होता आज हे पैसे त्यांच्या बँकेतील खात्यावर डायरेक्ट ट्रान्सफर होत आहेत .या लाभार्थी च्या चेहऱ्यावरील समाधान व त्यांचे आशीर्वाद हीच आमच्यासाठी लाल दिव्याची गाडी आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समर्जीतसिंह घाटगे केले.

कागल येथे वरील योजनेच्या लाभार्थीना मंजुरी पत्राचे वाटप व करण्यात आले त्या कार्यक्रमात ते बोलत होते.ते पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना सहाशे ची पेन्शन एक हजार केली. शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर येताच यामध्ये वाढ करून ती 1500 केली. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे ही रक्कम लाभार्थीच्या खात्यात जमा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो.त्यामधे यश आले.असे सांगून ते म्हणाले,अहंकार, दंडूकशाही हुकूमशाही , भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार थांबवण्यासाठीच मी राजकारणात आलो आहे.कागलची ओळख कामे अडवणे अशी झाली आहे ती मला पुसायची आहे.यावेळी राजेंद्र जाधव लाभार्थी, सुनील रामचंद्र मगदूम, पांडुरंग घाटगे सुवर्णा मांगले, विकी मगदूम यांनी आपल्या मनोगतातून पेन्शन मंजुरी बद्दल राजेसाहेब यांचे आभार मानले.यावेळी कागलचे माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, राजेंद्र जाधव, बॉबी माने, नंदू माळकर, युवराज पसारे, सतीश पाटील ,अजय चौगुले, अमरसिंह भोसले व भैय्यासाहेब इंगळे यांची उपस्थिती होती.स्वागत मकरंद कोळी यांनी तर प्रास्ताविक अरुण गुरव यांनी केले .आभार सुदर्शन मजले यांनी मानले.

राजे आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील दिले तर देवाने… नाहीतर राजाने, अशी सुरुवात करत तृतीय पंथीयाचे नेतृत्व करणारे सुनील रामचंद्र मगदूम म्हणाले, आज पर्यंत आम्ही शासकीय योजनेपासून वंचित होतो राजेसाहेब …खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय आणि सन्मान तुमच्यामुळे मिळाला आहे. तुमच्या पुढील वाटचालीत आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या बरोबर असतील.