जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांचे रक्तदान शिबिर संपन्न

कोल्हापूर: जिल्हा परिषद कोल्हापूर व जागर फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर आणि थोर समाज सुधारक अण्णाभाऊ साठे व शिक्षण तज्ञ कोल्हापूर जिल्ह्याचे पहिले खासदार बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

पावसाळ्यात उद्भवणारे साथीचेआजार आणि डेंगू साथीमध्ये निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा याची दखल घेऊन जागर फाउंडेशन कोल्हापूर व आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जवळपास 150 जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. वैद्यकीय तपासणीआंती एकूण 53 जणानी रक्तदान केले. यामध्ये आरोग्य विभागामार्फत व शिक्षण प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर कडील एकूण 40 जिल्हा परिषदचे इतर विभागातील 13 अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील म्हणाले की,रक्ताचा पुरवठा कमी झाला तर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस रक्तदान करूनच ती उणीव भरून काढावी लागते. रक्त बाजारात तयार होत नाही त्यामुळे जिल्ह्यात सर्व समाजसेवा संस्था शासकीय निमशासकीय संस्थांनी रक्तदान शिबिरे आयोजन करून जिल्ह्यातील रक्त पुरवठा पूर्ववत करण्यासाठी रक्तदानात सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे. यावेळी जागर फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक बी.जी. मांगले खेडेकर फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम खर्डेकर, माजी आमदार अमल महाडिक, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, मुख्यालय वित्त अधिकारी व्ही.टी. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर एच.डी. रणभोर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, सामान्य प्रशासन विभाग उपमुख कार्यक्रम अधिकारी मनीषा देसाई, ,जिल्हा परिषद खाते प्रमुख ,कर्मचारी उपस्थित होते.

🤙 8080365706