
नागापूर: येथे नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांनी गोंधळ घातल्याची बातमी समोर आली आहे.

यावेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातला. हुल्लडबाजांनी इतका गोंधळ घातला की त्यांनी थेट दगडफेक करायला सुरुवात केली. या दगडफेकीत एक महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.या गोंधळामुळे गौतमी पाटीलला अर्ध्यावरच कार्यक्रम बंद करावा लागला. यापुढे आयोजकांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नाही तर कार्यक्रम रद्द करण्याचा इशारा गौतमी पाटीलने दिला. गोंधळ झाल्यास मी कार्यक्रम घेणार नाही, अशी भूमिका गौतमी पाटील हिने जाहीर केली.
