विद्यार्थ्यांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी “महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज” ची सुरुवात

कोल्हापूर: राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी व त्यांचे नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत “महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज” चे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त, संजय माळी यांनी दिली.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातील कोणत्याही महाविद्यालय अथवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी किंवा जास्तीत जास्त ३ विद्यार्थ्यांचा समूह पात्र असेल. तसेच अर्ज करण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी व समूहाकडे नावीन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे.

🤙 8080365706