
पुणे : आता पुणेकरांना आणखी एक भेट मिळणार आहे. पर्यटकांचं आकर्षण असलेल्या लवासात पंतप्रधान मोदींचा पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. जगातील हा सर्वात उंच पुतळा असेल आणि याची उंची जवळवास 190-200 मीटर उंच असेल अशी माहिती मिळेतय.

डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रा ही कंपनी मोदींचा अतिभव्य पुतळा बनवणार आहे. 31 डिसेंबर 2023 आधी या पुतळ्याचं अनावरण होण्याची शक्यता आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमात जर्मनी, इस्त्रायल, फ्रांस, संयुक्त अरब अमीरात आणि अमेरिकचे राजदूतााचा सहभाग असेल अशी माहितीही मिळतेय. हा पुतळा पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाला आणि देशात अखंड एकात्मतेसाठी होत असलेल्या प्रयत्नांना समर्पित असेल असं सांगितलं जात आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुप ऑफ कंपनीला लवासा स्मार्ट सिटीसाठी संकल्प योजना मंजूर केली आहे. त्यामुळे आता पीएम मोदींच्या पुतळ्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याची शक्यता आहे.
