विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट सरकारमध्ये सहभागी झाल्याने आमदार संख्येचे आधारे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे देण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी घेतला. मात्र विरोधी पक्ष नेता कोण हे अजून समोर आलं नव्हतं. पण आज अखेर महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता मिळाला आहे. काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेता पदी नियुक्ती केली आहे.

तर विधिमंडळ पक्षनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. मागील 2 आठवड्यांपासून विरोधी पक्षनेते पदाचा उमेदवार कोण हे ठरत नव्हतं. मात्र 2 आठवड्यांनंतर अखेर विरोधी पक्षनेते पदाच्या नावावरील पडदा उठला आहे. दिल्लीमधून हा निर्णय घेण्यात आलंचं सांगितलं जात आहे. आज हायकमांडने महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. यासंदर्भात आता काँग्रेस पक्षाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पक्षाच्यावतीने पत्र पाठवून या नियुक्तीबद्दल कळवलं जाईल. यानंतर नियुक्तीबाबतच्या पुढील प्रक्रिया सुरु होतील असं सांगण्यात आलं आहे.

🤙 8080365706