
कराड : सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या १६७ व्या जयंती निमित्त इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनच्या वतीने गोपाळ गणेश आगरकर सुधारक पत्रकारिता पुरस्कार 2023 या राज्यस्थरीय पुरस्काराने महाराष्ट्रातील पत्रकार तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला. आगरकरांचे जन्मगाव टेंभू ता. कराड येथे सिक्कीमचे माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधारक शिक्षण संस्था टेंभूचे सचिव प्रकाश पाटील हे होते. तहसीलदार विजय पवार, उद्योजक रामकृष्ण वेताळ, टेंभू गावचे सरपंच युवराज भोईटे, इंद्रधनू फाऊंडेशन चे विस्वस्त नितीन ढापरे, विकास भोसले, माणिक डोंगरे, प्रमोद तोडकर, संदिप चेनगे, अशोक मोहने, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
