
अनेकांच्या घरात टोमॅटो हमखास असतात. परंतु तुम्हाला माहित आहे का ? जर आपल्याला काही विशिष्ट आजार असतील, शरीरात काही त्रास असेल तर टोमॅटोचे सेवन करणे टाळावे.

ज्या महिलांना मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव होतो, त्यांनी टोमॅटोपासून लांब रहावे. टोमॅटो सूप, टोमॅटो सॉस हे पदार्थ खाऊ नयेत. यामुळ शरीरातील त्रास वाढू शकतो.
स्किन ॲलर्जी किंवा शरीराला खाज येणे असा त्रास होत असेल तर टोमॅटोला हातही लावू नये, ते धोकादायक ठरू शकते. टोमॅटो, बटाटा, वांग, आंबट फळं व मसालेदार पदार्थ यामुळे शरीरात पित्तदोष वाढतो. ज्यामुळे खाज वाढू शकते.
आयुर्वेदानुसार गॅस, ॲसिडिटी किंवा अल्सर यांचा त्रास असेल तर त्यावेळीही टोमॅटो खाऊ नये. याचे सेवन केल्याने शरीरातील पचनक्रिया मंदावते आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. अपचन, तसेच छातीत जळजळ हा त्रास वाढू शकतो.
एखाद्या व्यक्तीला किडनी स्टोनची समस्या असेल तर त्याने चुकूनही टोमॅटो खाऊन नयेत. कारण टोमॅटोमध्ये कॅल्शिअम ऑक्सलेट असते, ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो. टोमॅटोच्या बिया पोटात पचत नाहीत आणि त्या किडनीत साठू शकतात. त्यामुळे स्टोनचा त्रास वाढू शकतो.
