श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन  चांद्रयान 3 चं यशस्वी प्रक्षेपण

मुंबई : श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन  चांद्रयान 3 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं.  14 जुलैला  घडाळ्यात 2 वाजून 35 मिनिटं झाली आणि भारताने अंतराळात एक नवीन इतिहास रचला.

लॉन्चिंगसाठी LVM-3-M4 रॉकेटचा वापर करण्या आलं आहे. सुमारे 3 लाख 84 हजार किलोमीटरचा प्रवास करुन चांद्रयान-3 हे 23 किंवा 24 ऑगस्टला चंद्रावर उतरेल. चांद्रयान-3 मिशन भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय. चांद्रयान चंद्रावर उतरेल तेव्हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही किमया करणारा भारत जगातला चौथा देश बनेल. संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागलं आहे.

🤙 8080365706