
कोल्हापूर : भारतात 68% लोकसंख्या ही कार्यकारी आहे. यामुळे भारत झपाटयाने विकसीत होऊन महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी कायदा करण्यापेक्षा जर आपण जनजागृती निर्माण करणे, लोकांना चांगले आरोग्य् व शिक्षण सुविधा उपलब्ध करुन देणे, लहान कुटूंबाचे महत्व् समजावून सांगणे आवश्यक असून स्त्री शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे. लोकसंख्या वाढीचा परिणाम साधन संपतीवर होऊन आर्थिक विषमता मोठया प्रमाणावर वाढत आहे. लोकसंख्या वाढीचा परिणाम अर्थ, पर्यावरण व समाजावर होत आहे. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अभ्यासमंडळाचे सदस्य् प्रा.डॉ.रत्नदीप जाधव यांनी केले.

ते भूगोल, समाजशास्त्र, अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त् विद्यमाने आयोजित ऑनलाईन व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.आर.कुंभार हे होते.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. आर.आर.कुंभार यांनी लोकसंख्या वाढीची कारणे, लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम , जागतिक लोकसंख्येचे वितरण यावर विवेचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ.जी.एस.उबाळे यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा.आण्णासाहेब वसेकर यांनी करुन दिली. आभार प्रा एच व्ही चामे यांनी मानले. सुत्रसंचालन प्रा. डॉ. शुभांगी काळे यांनी केले. IQAC समन्वयक डॉ.श्रुती जोशी, डॉ. कैलास पाटील, डॉ सोमनाथ काळे, डॉ.सुनिल भोसले, डॉ धीरज पाटील, डॉ निशा मुगडे, डॉ. सिध्दार्थ घोडेराव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
