केंद्र सरकारकडून कमी दरात टोमॅटो विकण्याची तयारी

मुंबई : देशात आज काही ठिकाणी केंद्र सरकारने टोमॅटो कमी दरात विकण्याची तयारी केली आहे. दिल्ली, लखनऊ, पटना अशा मोठ्या शहारात पासून स्वस्त टोमॅटोची विक्री होणार आहे.

दोन दिवसांपूर्वी अन्न मंत्रालयाच्या ग्राहक व्यवहार विभागाने टोमॅटोच्या किमती वाढल्या असल्यामुळे, त्याला कुठेतरी आळा बसवा म्हणून आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून या राज्यातून टोमॅटो खरेदी करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहेत.

ज्या मोठ्या शहरात मागच्या एक महिन्यापासून टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ आजपासून ९० रुपये किलो दराने टोमॅटो विकणार आहेत. त्याची तयारी सुरु झाली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात टोमॅटो खरेदीला सुरुवात केली आहे.

🤙 8080365706