
मेष : आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृषभ : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कामे रखडण्याची शक्यता.
कर्क : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कन्या : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
तुळ : एखादी गुप्त वार्ता समजेल. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
वृश्चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
धनु : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
मीन : जिद्दीने कार्यरत रहाल. हितशत्रुंवर मात कराल. आध्यात्मिक प्रगती होईल.
