ज्वारी खाण्याचे फायदे

ज्वारी सगळ्यांच्याच ओळखीचे कडधान्य आहे. पण काहींना ज्वारीची भाकरी आवडत नाही. ज्वारी आरोग्यासाठी खूप पौष्टिक असते. तर जाणून घेऊया ज्वारीचे फायदे.

ज्वारीमुळे पोट साफ होते. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. कारण ज्वारीमध्ये भरपूर तंतुमय पदार्थ असतात. अॅसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी चपातीच्या ऐवजी ज्वारीची भाकरी खावी. ज्वारीमुळे मुळव्याधीचा त्रास कमी होऊ शकतो.

ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे पोट भरते. शरीरास ऊर्जा मिळते. ज्वारीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम असते. यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. सध्या ब्लडप्रेशर आणि हृदयविकार वाढले आहेत. यासाठी आहारात रोज ज्वारी असावी.

ज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. लाल पेशींची वाढ होते. अशा व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो.

ज्वारीमुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. सध्या लठ्ठपणा ही मोठी समस्या आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. जेवणात ज्वारी असल्यास अतिरिक्त चरबी कमी होते.

🤙 8080365706