आज गुरु शिष्य नात्यांची मुळे सुकली आहेत का ? – डॉ. शिवाजी गावडे

कोल्हापूर : कै. हनमंतराव उर्फ बाळासाहेब गणपतराव खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या छत्राध्यापकांनी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली. फुलांचा मोठा सडा टाकून सर्व गुरुवर्यांचं छत्राध्यापकांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या गुरूंच विचारमंचावर स्वागत केलं. यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या सर्वांच्या प्रेरणास्थान डॉ. सी.जी. खांडके यांनी वृक्षाला पाणी घालून या कार्यक्रमाचे उद्घाटन केलं. छत्राध्यापिका शामली माळवी यांनी गुरुविषयी प्रार्थना सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छात्रध्यापक वैभव प्रधान यांनी करून कार्यक्रमाच्या आयोजना संदर्भात व गुरु विषयी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर सर्वच आदरणीय गुरुवर्यांचा सन्मान आयोजित समितीच्या सर्व सदस्यांच्या वतीने मानपत्र ,पुस्तक व पुष्प देऊन करण्यात आला. यानंतर प्रमुख वक्ते डॉ. शिवाजी गावडे म्हणाले, आज गुरु शिष्य नात्यांची मुळे सुकली आहेत का असा प्रश्न पडतोय म्हणूनच याचा शोध घेणे खूप गरजेचे आहे.

कारण ही मुळे सुकल्यामुळे आजचे विद्यार्थी ,निराश ,हतबल होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. आणि म्हणून हे सगळं थांबवण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांचे भावविश्व शोधण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. सी. जी. खांडके म्हणाल्या गुरुला संघर्ष करावा लागतो. आणि ज्ञानाचा संघर्ष करूनच चांगला शिष्य घडवण्याचं काम करू शकतो. आज गुरुपौर्णिमा साजरी करत असताना माझ्या सर्व छात्राध्यापकांनी संघर्ष करूनच चांगलं माणूस बनण्याचं व गुरु बनण्याचं काम करावं त्यासाठी लागेल ते ज्ञान गुरूकडून तुम्ही घ्यावं आणि भविष्य घडवावं हीच अपेक्षा गुरुची असते आणि यातच त्याच समाधान असते. ही भावना व्यक्त केली.यावेळी डॉ.ए. एस.पाटील, प्रा. एस. ए. कांबळे या गुरुवर्यांनी तर संजय पाटील व सायली पाटील या छात्राध्यपकांनी आपली मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमासाठी डॉ.एम.आर. पाटील, डॉ. आर. एस. अवघडे कार्यालयीन कर्मचारी नौशाद सत्तारमेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुणा शेलार व शामली माळवी यांनी केले. तर आभार प्रियांका सुतार यांनी मानले हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी, शरयू सावंत, प्रियांका कटाळे, लता पाटील, प्रियांका सावंत, शैलेश डप्पडवाड, ऋषिकेश शेलार, सलोनी पाटील, सायली पाटील, संपदा वीर,गौरी भोसले, प्राजक्ता पाटील, रोहिणी पोतदार यांनी परिश्रम घेतले. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.

🤙 8080365706