जिल्ह्यातील दिग्गज आमदार आता फक्त वेटींगवर

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्तेमध्ये प्रवेश करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.यामुळे राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. या नव्या राजकीय भूकंपामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दिग्गज आमदारांना आता मंत्री पदासाठी वेटिंगच करावी लागणार आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रकाश आबिटकर, राजेंद्र यड्रावकर,प्रकाश आवाडे,विनय कोरे या दिग्गज आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता होती. पण राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागामुळे आणि कोल्हापुरातून कागल विधानसभेचे आमदार हसन मुश्रीफ यांना मंत्रिपदी संधी मिळाल्याने या आमदारांना मंत्रिपदासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

🤙 8080365706