मी शरद पवार यांच्यासोबतच : जयंत पाटील

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होऊन राष्ट्रवादीचे बडे नेते अजित पवार सत्तेमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री बनले.तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मी शरद पवार यांच्या सोबतच असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिल्याने विरोधी पक्षनेतेपदी आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पदासोबतच पक्ष प्रतोद पदही सोपवण्यात आले आहे .नव्या बदललेल्या राजकीय समीकरणानुसार हसन मुश्रीफ यांना मंत्रीपद मिळाल्याने मंत्रिपदाच्या शर्यतीत असणारे आमदार प्रकाश आबिटकर आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे दोघे अडचणीत सापडले आहेत. मुश्रीफ यांची मंत्रिपदी वर्णी लागल्याने मुश्रीफ आता कोल्हापूरचे पालकमंत्रीही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

🤙 8080365706