
कोल्हापूर : घडलेल्या राजकीय महानाट्यानंतर महाराष्ट्रात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता राष्ट्रवादी कोणाची हा प्रमुख प्रश्न निर्माण झाला आहे.

कारण जेष्ठ नेते पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणताहेत की,पक्षाध्यक्ष मी असल्याने राष्ट्रवादी माझीच तर भाजपबरोबर जाऊन उपमुख्यमंत्री पद मिळवलेले अजित पवार म्हणताहेत माझ्यासोबत राष्ट्रवादी चे 40 आमदार असल्याने राष्ट्रवादी माझीच.यावरून काका पुतण्यात राष्ट्रवादी कोणाची हा संघर्ष नव्याने सुरू झाला आहे. या सत्ता संघर्षात उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्याकडे आमदार असल्याचे सांगत आहेत तर शरद पवारांनी गेलेल्या आमदाराना परत आणण्यासाठी कोणताही कायदेशीर प्रयत्न करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे परंतु त्यांना माघारी आणण्यासाठी दूरध्वनीवरून प्रयत्न सुरू केले संपर्क साधला आहे. यावरून येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादी पक्षाची सूत्रं कोणाच्या हातात येतात हे चित्र स्पष्ट होईल.
