दोन-तीन दिवसात राज्यातील चित्र स्पष्ट होईल : शरद पवार

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होऊन अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

आता महाराष्ट्रात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत.या राजकीय भूकंपावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणाऱ्या शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी माझ्याशी कोणताही संपर्क साधला नसून छगन भुजबळ यांच्याशी फक्त बोलणं झाल असल्याचं पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितल.काही आमदारांनी सह्या करताना आमचा नाईलाज झाला असून अजित पवार यांच्यासोबत असलेल्यांनी माझ्याशी संपर्क साधला असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं आहे. विधीमंडळातील आमदारांनी कितपत वेगळी भूमिका घेतली, याबद्दल चित्र आणखी दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे इशाराच दिला आहे.

🤙 8080365706